क्षुल्लक कारणावरून १४ वर्षीय मुलीची आत्महत्या

0

पिळोदे येथील घटना

अमळनेर : तालुक्यातील पिळोदे येथील १४ वर्षीय मुलीने आई बाजारात घेऊन जात नाही अशा क्षुल्लक कारणाने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिळोदे येथील मालुबाई कोळी ह्या बाजार करण्यासाठी अमळनेर जात होत्या, त्यावेळी त्यांची मुलगी माया सुधाकर कोळी (वय १४) ही सोबत येण्याचा हट्ट करीत होती. मात्र मालुबाई यांनी तिला नकार दिल्याने माया हिने संतापात घराचा दरवाजा आतून लावून घेतला. मालूबाई ह्या बाजार करून घरी आल्यानंतर माया हिने साडीच्या सहाय्याने घराच्या लाकडी सऱ्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. ग्रामस्थांच्या मदतीने तिला खाली उतरवून ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे आणले असता डॉक्टरांनी तिला त्याठिकाणी मयत घोषित केले. याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!