शालेय शासकिय कॅरम स्पर्धेत जी एस हायस्कुल खेळाडूचे प्राविण्य
अमळनेर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद जळगाव तसेच अमळनेर तालुका क्रीडा परिषद आयोजित शासकिय तालुकास्तरीय शालेय कॅरम क्रीडा स्पर्धा नुकत्याच जय योगेश्वर विदयालयात संपन्न झाल्या. या स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील एकुण २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, अत्यंत अटि तटीच्या या स्पर्धेत खा,शि,मंडळ संचलीत जी एस हायस्कुल शाळेने १४ वर्षाच्या मुलांच्या गटात मंयक संजय पवार व हितेश किरण पारधी, १७ वर्षाच्या गटात उदय अनिल पवार यांनी उत्कृष्ट कौशल्यदार खेळ खेळत विजेते पद मिळविले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले असुन पुढील स्पर्धा दि. १२ ते १४ सप्टेंबर २०२४ दरम्यान छ. शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे होणार आहे.
वरिल खेळाडूनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा शालेय समिती चेअरमन हरी भिका वाणी यांनी सत्कार केला.
वरिल खेळाडूंना खा,शि.मं.चे कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी , कार्यापाध्यक्ष निरजजी अग्रवाल , संस्थेचे संमन्वय समिती चेअरमन डॉ. अनिल शिदे ,शालेय समिती चेअरमन हरि भिका वाणी , खा.शि.मं.चे संचालक योगेश मुंदडे, संचालक प्रदीप अग्रवाल , संचालक विनोद पाटील, शिक्षक प्रतीनीधी विनोद कदम , मुख्याध्यापक बी एस पाटील, उपमुख्याध्यापक ए डि भदाणे , पर्यवेक्षक एस आर शिंगाणे, पर्यवेक्षक सी एस सोनजे, शाम पवार , पंकज जैन तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करुन जिल्ह्यास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .वरिल खेळाळुंना क्रीडा विभाग प्रमुख व शिक्षक प्रतिनीधी एस पी वाघ, व जे व्ही बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले.