राज्यपालांना बसपा नेत्यांचे विविध मागण्यांचे निवेदन

0

शिक्षण, रोजगार, आरोग्य, शेती- सिंचन, अतिक्रमण /पुनर्वसन, आरक्षण इत्यादी विषयावर चर्चा 

जळगाव : कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसताना क्रीमी लेयर किंवा जातीअंतर्गत आरक्षणाला आमचा विरोध असून आरक्षण हे प्रतिनिधित्व सिद्ध करण्यासाठी असून त्यात आर्थिक स्थिती आणि आरक्षण घेणारी पहिली दुसरी पिढी असा भेद मान्य नसल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळांना पुरेसा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे तथा केजी टू पीजी शिक्षण निशुल्क दिले पाहिजे.जि प शाळांची दयनीय स्थिती असून त्यांना अधिक आधुनिक करून दर्जेदार शिक्षण देण्याची व्यवस्था शासनाने केली पाहिजे. रोजगारासाठी फाईव्ह स्टार एम आय डी सी ची प्रत्येक तालुक्यात निर्मिती होणे आवश्यक असल्याचेही सांगितले. शेतकरी, कष्टकरी यांचे प्रलंबित प्रश्न युद्ध पातळीवर सुटले पाहिजेत.
अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी गेल्या १०० व वर्षापासून
रेल्वेच्या जमिनीवर घरे करून राहात होती त्यांची कुठलेही पर्यायी पुनर्वसन न करता त्यांना बेघर करण्यात आले आहे. अश्या लोकांना निवाऱ्याचा हक्क प्राप्त झाला पाहिजे.
विकास तर हवाच आहे त्यासाठी फक्त गरिबांची घरे उध्वस्त करून हा विकास बनावट होईल.रेल्वेच्या प्रवासात सामान्य माणसाला प्राण्यासारखे कोंबून प्रवास करणे भाग पडते त्यांच्या साठी बोग्या वाढवा, फक्त श्रीमंतांच्या सोयीचे निर्णय मान्य नाहीत.
आरक्षणात फक्त वर्गीकरण न करता देशातील जमिनी मूठभर भांडवलंदाराकडे एकवटल्या गेल्या असून त्यांचं हि पुनर्वाटप झाले पाहिजे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचेशी निवेदनावर बसपा पदाधिकारी राहुल बनसोडे – (जिल्हा अध्यक्ष ), गौतम मोरे,अमळनेर (मा. प्रदेश महासचिव) नारायण अडकमोल – (जिल्हा उपाध्यक्ष), सुरेश गणविर – (जि. प्रभारी ),राजाराम मोरे -( जि. महासचिव ) शैलेजा सुरवाडे – (जि.कोषाध्यक्ष) विलास लुले ( जि. बीव्हीफ संयोजक ) सचिन ए बाविस्कर – (चोपडा विधानसभाध्यक्ष) सुशील केदारे ( वरिष्ठ कार्यकर्ता) आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!