प्रताप महाविद्यालयाच्या मराठी विभागात विविध विषयांवर व्याख्यानांचे आयोजन
अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर आणि उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभागात विविध विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. ९ सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी ११ ते १२ या वेळेत किसान महाविद्यालय, पारोळा येथील डॉ. प्रदीप औजेकर हे मराठी भाषा आणि नोकरीच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, तर १० सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी ११ ते १२ या वेळेत एस. पी. डी. एम. कॉलेज, शिरपूर या महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. फुला बागुल यांचे समृद्ध जगण्यासाठी : मराठी साहित्य या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि. १३ सप्टेंबर रोजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदवड येथील प्रसिद्ध कवी डॉ.सुदाम राठोड यांचे नवदोत्तरी कविता या विषयावर व्याख्यान होणार आहे. सदरच्या सर्व सत्रांच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चिटणीस तथा प्राचार्य डॉ. अरुण जैन आणि संस्थेचे सह-चिटणीस डॉ.धीरज वैष्णव यांची उपस्थिती राहणार आहे.
तरी सर्व पदवी, पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी, संशोधक, मार्गदर्शक व प्राध्यापक, व परिसरातील जाणकार वाचक यांनी प्रस्तुत व्याख्यानांना यावे लाभ घ्यावा, असे आवाहन मराठी विभागातील विभाग प्रमुखासह सर्व सहकाऱ्यांनी आणि महाविद्यालयीन प्रशासन यांच्या कडून करण्यात येत आहे.