जय भोलेनाथ बचत गटात लाखोंचा हेरफार ?
अध्यक्ष व सचिव यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची इतर सभासदांची मागणी
अमळनेर : शहरातील सप्तशृंगी नगर, झामी चौक भागातील जय भोलेनाथ महिला बचत गटात लाखोंचा हेरफार झाला आहे असा आरोप करत संबंधीत अध्यक्ष व सचिव यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी इतर सभासद करीत आहेत.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर शहरातील सप्तशृंगी नगर , झामी चौक भागात गेल्या अनेक वर्षांपासून जय भोलेनाथ महिला बचतगट काम करीत आहे. या बचत गटात सुमारे 12 सभासद असून कोणालाही विश्वासात न घेता अध्यक्ष व सचिव निर्णय घेऊन मनमानी करीत असल्याचा आरोप सभासदांनी केला आहे. गटाच्या दप्तरांवर देखील खाडाखोड केली आहे. प्रोसिडिंग वर जेथे काहीच विषय लिहिलेले नाहीत तेथेही सभासदांच्या सह्या घेतल्या आहेत. आणि या सर्वांवर नियंत्रण ठेवणाऱ्या गट प्रवर्तक यांना पाठबळ या लोकांना पाठबळ देत असल्याचा आरोपही होत आहे.
या लोकांवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी इतर सभासद काही महिन्यांपासून नगर परिषदेत फेऱ्या मारत आहेत. मात्र त्यांचं कोणीही ऐकून घ्यायला तयार नाही. त्यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांचीही भेट घेतली असून जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे की, हेरफार दिसत आहे तर सरळ गुन्हा दाखल करा, म्हणून आता संबंधित तक्रारदार सभासदाचा मुलगा जयेश जगताप व इतर लोकं पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.