पांझरा माईचे रौद्र रूप शमले…
नदी पत्रातील पाणी मुडी गावाच्या वेशीजवळ होते पोहचले
अमळनेर : काल सोमवारी धुळे जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यातील काही गावांनी पांझरा आईचे रौद्र रूप पाहिले, रात्री उशिरा पर्यंत मुडी गावाच्या वेशी पर्यंत हे पाणी पोहचले होते. शेवटी मध्य रात्री पासून पांझरा माईचे रौद्र रूप शमले असून सध्या अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग कमी झाला असल्याने नदी पत्रात पाणी कमी झाले आहे.
पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू होता व त्या पावसामुळे तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने व वरील बाजूस असणाऱ्या पांझरा, मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून 28274 क्यूसेक विसर्गाने पाण्याचा येवा होता त्यामुळे अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात होता. म्हणून पांझरा नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. काल संध्याकाळ धरणात 18000 क्युसेक विसर्ग सोडण्यात आलेला होता. व पुढील काही तासांत विसर्ग वाढवून 32000 ते 35000 क्युसेक पर्यंत वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली होती. दरम्यान सध्या स्थितीत पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सुदैवाने नदी पत्रातील पाणी कमी झाल्याने कोणतीही जीवित अथवा वित्त हानी टळली.