रंजाणे येथील एकाचा लाडगाव जवळ नदीत बुडून मृत्यू…
आज सकाळी मिळाले शव…

अमळनेर : तालुक्यातील रंजाणे येथील एकाचा लाडगाव जवळ नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. लाडगाव कडून सदर इसम बोरी नदीत उतरला व तेथील पाण्यात बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी उजेड असेपर्यंत त्यास शोधणे शक्य झाले नाही तर आज गुरुवारी सकाळच्या सुमारास त्याचे शव मिळून आले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, रंजाणे येथील विश्वास मालचे (वय अंदाजे 55) हा इसम लाडगाव येथून रंजाणे येथे शॉर्टकट जाण्यासाठी थेट नदीत उरला व त्याचा पाण्यात तोल जाऊन तो पडून गेल्याचे तेथील प्रत्यक्ष दर्शणींनी सांगितले आहे. स्थानिकांकडून बुधवारी संध्याकाळ पर्यंत शोधमोहीम सुरू होती, मात्र तो इसम मिळून आला नव्हता. म्हणून आज सकाळी – सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू झाली असता. विश्वास मालचेचे शव मिळून आले असून त्यास अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे.
