अमळनेर ची जनता सुज्ञ आहे, लोकप्रतिनिधी त्यांना मूर्ख बनवू शकणार नाहीत…. प्रा. अशोक पवार

0

अमळनेर : मंत्री अनिल पाटील यांच्या समर्थकांकडून अमळनेर शहरात लावण्यात आलेल्या बॅनरला आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उत्तर देण्यात आले असून अमळनेरची जनता सुज्ञ आहे, लोकप्रतिनिधी त्यांना मूर्ख बनवू शकणार नाहीत…. असे म्हणत त्यांनी खालील करणे  दिली आहेत….. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे इच्छुक उमेदवार प्रा. अशोक पवार यांनी हे प्रसिद्धीस दिले आहे.

प्रा. अशोक पवार यांनी प्रसिद्ध केलेला विषय खालील प्रमाणे…

1) निम्न तापी पाडळसे धरणाला ४८९० कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता कोणामुळे मिळाली
सुज्ञ जनता – पाडळसे धरणाची किंमत बदलली की सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यावी लागते. आतापर्यंत ही तिसरी प्रशासकीय मान्यता आहे.
26 वर्षात धरण पूर्ण न झाल्याने 142 कोटी किमतीचे धरण 4890 कोटीला गेले याची थोडीफार तरी लोकप्रतिनिधींना काही वाटत नाही?
धरणाच्या वाढीव किमतीला मंजुरी घेणे हा काही पराक्रम नाही…
अजून धरणाची किंमत बदलेल पुन्हा सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यावी लागेल.
2) केंद्रीय जल आयोगाची Investment Clearan चा मार्ग कोणामुळे मोकळा झाला.
सुज्ञ जनता – केंद्रीय जल आयोगाची ही दुसऱ्यांदा मान्यता आहे हे काम तापी महामंडळाचे व जलसंपदा सचीवांचे हे प्रशासकीय काम आहे. या कार्यालयीन तांत्रिक बाबी आहेत. हा मिरवण्याचा कार्यक्रम नाही.
3) केंद्रीय वन विभागाची मंजुरी कोणामुळे मिळाली
सुज्ञ जनता – केंद्रीय वन विभागाची मंजुरी घ्यायला पाच वर्षे लागतात का ? ही शरमेची गोष्ट आहे. हे प्रशासकीय काम आहे स्वतःची पाट थोपटून घेण्याची आवश्यकता नाही.
4) पाडळसे धरणा च्या आड येणाऱ्या अडचणी कोणामुळे सुटल्या.
सुज्ञ जनता – या अडचणी प्रशासनामुळे तात्पुरत्या सुटल्या, पुन्हा या अडचणी निर्माण होणार आहेत.
5) पाडळसे धरणाला राज्य सरकारकडून सगळ्यात जास्त 508 कोटीचा निधी कोणी आणला ?
सुज्ञ जनता – पाडळसे धरण राज्य सरकारच्या निधीतून कधीही होणार नाही. तज्ञ अधिकाऱ्यांच्या मते दरवर्षी 500 कोटी धरणासाठी मिळाले तरच धरण दहा ,पंधरा वर्षात पूर्ण होऊ शकते. दरवर्षी पाचशे कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम केंद्र सरकारच देऊ शकते. पाच वर्षात 500 कोटी मिळाले तर धरण अजून पंचवीस वर्षे होणार नाही.
6) सुज्ञ जनता – पाडळसे धरण पंतप्रधान सिंचन योजनेत समाविष्ट झालेले नाही .हे त्रिमूर्ती सरकारचे अपयश आहे.
पाडळसे धरणे या प्रश्नावर जाहीर चर्चेस सुज्ञ जनता तयार आहे. तारीख व वेळ कळवा.

जनहितार्थ

प्रा. अशोक पवार – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, अंमळनेर विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार. मो -9422278256….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!