७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन दाऊदी बोहरा समाजाकडूनही उत्साहात साजरा…
अमळनेर : दि. १५ ऑगस्ट रोजी दाऊदी बोहरा समाज अमळनेर यांच्या तर्फे ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ समाजाच्या बिल्डिंगवर आयोजित करण्यात आला होता. आमील मान. शेख ताहेर वजीरी यांचे शुभ हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी सर्व समाज बांधवांनी पांढराशुभ्र असा विशेष पोशाख परिधान केलेला होता. अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने शेख अहसान बुऱ्हानी, शेख अली हुसेन सैफी, शेख मोहम्मद बोहरी, शेख अझहर, शेख मोहम्मद करमपुरवाला , शेख अब्बास सैफी, मुल्ला अहेमदी बुऱ्हानी, मोईज बोहरी, मुल्ला हुसेन इझी , मुस्तफा जावेद , जाकिर , जोएब बोहरी, खुजेमा सैफी, अब्दुल कादिर बुक वाला तर बीजीआय चे व्हॉइस कॅप्टन अजिज, मुस्तफा कलकत्ता वाला, अली अजगर अलाबक्ष, हुसेन बोहरी, अब्दुल कादिर जावेद, अली अजगर शाकीर,शब्बीर मुस्तफा, हुसेन पारोलावाला, तर तोलोबा तर्फे होजेफा सैफी, आणि सेक्युरिटी तर्फे शब्बीर बुकवाला व शब्बीर अकील आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती पीआरओ मकसूद बोहरी यांनी दिली आहे.