आकाश चिंचोरे यांची राज्य राखीव पोलीस दलात निवड
प्रताप महाविद्यालयात झाला सत्कार….
अमळनेर : प्रताप महाविद्यालयातील करिअर कौन्सलिंग सेंटरचा विद्यार्थी आकाश समाधान चिंचोरे(मु.पोस्ट जैतपीर) या विद्यार्थ्याची राज्य राखीव पोलीस दलात (SRPF) धुळे येथे निवड झाली आहे.
आकाशचे वडील हे शेतकरी आहेत, त्याचा मोठा भाऊ सुशील हा सीसीएमसी विभागाचा विद्यार्थी होता त्याची २०२३ मध्ये मुंबई पोलीस म्हणून निवड झाली. एक वर्षात पुन्हा आकाशची निवड ही सतत अभ्यास, नियोजन व परिश्रमाचे फलित आहे.
आकाश हा लेखी परीक्षेत जळगाव जिल्ह्यात द्वितीय आला आहे, त्याने एकूण २०० पैकी १८० गुण मिळविले. या यशा बद्दल खा. शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी, कार्यउपाध्यक्ष सीए नीरज अग्रवाल, प्राचार्य डॉ.अरुण जैन, खा.शिक्षण मंडळाचे सहसचिव डॉ.धिरज वैष्णव,उप प्राचार्य डॉ.अमित पाटील, करिअर कौंसेलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे, डॉ.आर सी सरवदे, डॉ.धनंजय चौधरी, ग्रंथपाल दिपक पाटील, डॉ.जितेंद्र पाटील, डॉ.माधव भुसनर, डॉ.रवी बाळसकर, प्रा.वृषाली वाकडे, डॉ.विलास गावित, प्रा.नितेश कोचे, प्रा.विजय साळुंखे, डॉ.बालाजी कांबळे, प्रा.चंद्रशेखर वाडे, प्रा.चंद्रकांत जाधव, डॉ.राखी घरटे, प्रा.हर्ष नेतकर, प्रा.सोनूसिंग पी.पाटील, प्रा.दिलीप तडवी, दिलीप शिरसाठ, मेहूल ठाकरे, पराग पाटील आदींनी अभिनंदन व कौतुक केले आहे.