प्रताप महाविद्यालयात नशा मुक्त भारत अभियान
विद्यार्थ्यांनी घेतली अमली पदार्थ विरुद्ध प्रतिज्ञा
अमळनेर : सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय यांच्या सूचनेनुसार विकसित भारत का मंत्र भारत हो नशे से मुक्त या संकल्पनेवर आधारित भारताला अमली पदार्थ मुक्त बनविण्याच्या दृष्टीने व मादक पदार्थाच्या गैरवापराचा प्रतिबंध करण्याकरता नशा मुक्त भारत अभियान प्रताप महाविद्यालय अमळनेर राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे राबविण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व स्वयंसेवकांनी अमली पदार्थ विरुद्ध प्रतिज्ञा घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य व खानदेश शिक्षण मंडळाचे चिटणीस डॉ.अरुण जैन यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आपल्या आजूबाजूला व्यसनाधीन झालेल्या सर्वांना योग्य मार्गदर्शन करून विडी, तंबाखू, सिगारेट व अमली पदार्थांची नशा न करण्याचे जाहीर आवाहन करावे,असे मत मांडले.विद्यार्थ्यांनी यावेळी निरोगी जीवन जगण्याची शपथ घेतली. याप्रसंगी खानदेश शिक्षण मंडळाचे सहसचिव प्रा.डॉ.धीरज वैष्णव, उपप्राचार्य प्रा. डॉ.अमित पाटील, प्रा. मोरे, प्रा.भाग्यश्री जाधव तसेच यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ हेमंत पवार तर सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सुनिल राजपूत यांनी आभार मानले.