अक्षय बिऱ्हाडे मृत्यू प्रकरणी चौकशी होण्याची मुख्यमंत्री शिंदे यांना मंत्री अनिल पाटील यांच्याकडून विनंती

0

तर बिऱ्हाडे कुटुंबियांना तात्काळ मदत द्या…. मंत्री पाटलांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

मुख्यमंत्री शिंदे व आरोग्य मंत्री सावंत यांच्या मार्फत चौकशीचे व मदतीचे आदेश

अमळनेर : मुंबईच्या बाळेगाव ११ क्रमांक कॅम्प येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या भरती दरम्यान मयत झालेल्या अमळनेर येथील अक्षय बिऱ्हाडेच्या कुटुंबियास मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत द्यावी या मागणीचे विनंती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती पत्र देऊन केली आहे. तसेच उपचारा दरम्यान डॉक्टरांचा हलगर्जीपणा असल्यास चौकशीची मागणीही आरोग्य मंत्र्यांकडे त्यांनी केली आहे.
या पत्रात म्हटले आहे की स्व. अक्षय मिलींद बिऱ्हाडे, रा. प्रबुध्द कॉलनी, स्टेशन रोड, ता. अमळनेर जि. जळगाव हा एसआरपीएफ भरती प्रक्रीयेदरम्यान राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. ११, नवी मुंबई कँप, बाळेगाव येथे मैदानी चाचणी सुरु असताना चक्कर येऊन पडल्याने छत्रपती शिवाजी हॉस्पीटल, कळवा जि. ठाणे या रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान दि.२९ जून रोजी दुर्दवी मृत्यू झाला आहे.
मयत अक्षय चे वडील मिलींद बिऱ्हाडे यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असून कुटूंबातील एकुलता एक मुलगा गेल्याने त्यांच्या कुटूंबावर दुखाःचा डोंगर कोसळलेला आहे. तरी मिलींद बिऱ्हाडे यांना आर्थिक मदतीची आवश्यकता असून, मुख्यमंत्री सहायता निधीमधून विशेष बाब म्हणून लवकरात लवकर मदत मिळावी अशी विनंती मंत्री पाटील यांनी केली असून या बाबत तात्काळ हालचाली कराव्यात व बिऱ्हाडे कुटुंबियांना मदत मिळवून द्यावी असे आदेशही त्यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांना दिले आहेत.

डॉक्टरांचा हलगर्जीपणा असल्यास कारवाईची मागणी


सदर घटनेत अक्षयच्या उपचारादरम्यान डॉक्टरांकडुन हलगर्जीपणा झाला असल्यामुळेच अक्षयचा मृत्यू झाला आहे असे त्याच्यासोबत रुग्णालयात असलेल्या कुटुंबियांचे म्हणणे असल्याने व याबाबत मंत्री अनिल पाटील यांच्याकडे तशी तक्रार प्राप्त झाल्याने या तक्रारीची चौकशी करून दोषी असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करावी व्हावी अशी विनंती मंत्री अनिल पाटील यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे लेखी पत्र देऊन केली आहे.

चौकशी व मदतीसाठी हालचाली सुरू

मयत अक्षयच्या कुटुंबियांना तात्काळ मदत घ्यावी यासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांना पत्र देण्यात आले असून या घटनेत जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर चौकशी होऊन कारवाई व्हावी असे विनंतीपर पत्र काल राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना दिले आहे.

मंत्री अनिल पाटील यांनी काल दिलेल्या पत्रावर मुख्यमंत्री शिंदे यांनी शेरा देत या प्रकरणास विशेष बाब म्हणून मदतीसाठी तात्काळ प्रस्ताव सादर करावा असा आदेश महाराष्ट्र राज्याच्या लेखा विभागास दिले आहेत.

तर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांना देखील दोषींवर चौकशी होऊन कारवाई होण्यासाठी मंत्री पाटील यांनी विनंती केली होती. यावर आरोग्य मंत्री सावंत यांनी या घटनेबाबत तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा असे आदेश त्यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!