महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने गरजू कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप

0
IMG-20261108-WA0025

पाचपावली चौकासह वर्णेश्वर परिसरातील गरीब कुटुंबांना फराळ व मिठाईचे वाटप

पत्रकार संघाचा सामाजिक उपक्रम

 

अमळनेर : दिवाळी सणाचा आनंद समाजातील गोरगरीब व गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचावा, या सामाजिक भावनेतून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, अमळनेरच्या वतीने रविवारी दिवाळीनिमित्त फराळ व मिठाई वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पाचपावली चौक परिसरातील गरजू कुटुंबांना तसेच चोपडा नाक्याजवळील वर्णेश्वर परिसरातील गरीब कुटुंबांना दिवाळीचा फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

     या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष डॉ. समाधान मैराळे, उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष डॉ. विजय गाडे सर ,जिल्हा संघटक प्रवीण बैसाणे ,जिल्हा उपाध्यक्ष विजय संदानशीव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या सामाजिक उपक्रमाला विजय पाटील व प्रेम सासनाने यांचे विशेष सहकार्य लाभले.

यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे, तालुका सचिव नूरखान पठाण, उपाध्यक्ष हृदयनाथ मोरे, हितेंद्र बडगुजर, आत्माराम आहिरे,संदीप सैंदाणे, प्रकाश बोरसे आदी पदाधिकारी वसदस्य उपस्थित होते.

     दिवाळीचा खरा आनंद हा केवळ स्वतःच्या घरापुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू घटकांसोबत सणाचा आनंद वाटण्यात आहे, हा संदेश या उपक्रमातून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!