दुष्काळाच्या नावाखाली वाढदिवस न करण्याचा आव

0
IMG-20261105-WA0037

अन् गावभर बॅनरचा थाट

अशोक पाटलांचा दुटप्पीपणा चर्चेत

 एकीकडे दुष्काळाची जाणीव दाखवत वाढदिवस साजरा न करण्याची घोषणा, तर दुसरीकडे गावभर झळकणारे वाढदिवसाचे बॅनर! मग हा साधेपणाचा निर्णय की केवळ प्रसिद्धीसाठी केलेला दिखावा?


 

अमळनेर : बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. एवढेच नव्हे, तर त्यांनी स्वतःही तसे जाहीर केले होते. त्यांच्या या निर्णयाचे काहींनी स्वागतही केले. मात्र, प्रत्यक्षात गावभर झळकणारे वाढदिवसाचे भव्य बॅनर पाहता या घोषणेतील गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

दुष्काळ जनतेच्या वाट्याला आणि वाढदिवसाचे बॅनर मात्र गावाच्या भिंतीवर, हा नेमका कोणता सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श?

एकीकडे वाढदिवस न साजरा करण्याची घोषणा करायची आणि दुसरीकडे त्याच वाढदिवसाचे बॅनर गावभर झळकायचे, हा विरोधाभास नक्की कोणाच्या सांगण्यावरून निर्माण झाला? बॅनर लावणाऱ्यांना सभापतींच्या निर्णयाची माहिती नव्हती की निर्णयाची माहिती असूनही प्रसिद्धीचा मोह आवरला गेला नाही? कारण ज्यांनी बॅनर लावली ती अनेक लोकं ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असल्याने ही चर्चा अधिक तीव्र होत आहे. 

राजकारणात प्रतिमा जपण्यासाठी शब्दांचा वापर करणे सोपे असते; मात्र कृतीतून त्या शब्दांची प्रामाणिकता सिद्ध करावी लागते. दुष्काळाच्या काळात वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय खरोखर मनापासून घेतला असेल, तर गावभर झळकणाऱ्या बॅनरबाबतही स्पष्ट भूमिका घेणे अपेक्षित आहे.

ओठात सामाजिक बांधिलकीचे बोल आणि प्रत्यक्षात प्रसिद्धीचा झगमगाट, असे चित्र निर्माण होत असेल तर त्याला दुटप्पीपणा म्हणायचे नाही तर काय?

अशोक पाटील यांनी याबाबत मौन न बाळगता जनतेसमोर स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. कारण प्रश्न केवळ वाढदिवसाच्या बॅनरचा नाही, तर सार्वजनिक जीवनातील भूमिका आणि प्रत्यक्ष कृती यांच्यातील प्रामाणिकपणाचा आहे.

दुष्काळामुळे वाढदिवस न करण्याचा निर्णय खरा असेल, तर बॅनरबाजीला लगाम का नाही? आणि बॅनरबाजीला संमती नसेल, तर ती थांबवण्यासाठी पुढाकार का घेतला नाही?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!