मांडळ भागात वाळू वाहतूक मस्त 

0
IMG-20261105-WA0006

महसूल विभाग मात्र सुस्त!

 

अमळनेर : अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील पांझरा नदीपात्रातून सध्या मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, या प्रकाराकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

नदीपात्रातून सुरू असलेल्या वाळू वाहतुकीमुळे शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. एकीकडे अवैध वाळू उपशावर कारवाई करण्याची जबाबदारी महसूल विभागाची असताना, प्रत्यक्षात मात्र या प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

महसूल विभागाची जबाबदारी नेमकी कोणाची?

महसूल विभाग जर प्रत्येक वेळी सर्व कारवाईची जबाबदारी पोलीस विभागावर ढकलून स्वतः हात वर करत असेल, तर शासनाकडून हजारो रुपये वेतन घेणारे महसूल अधिकारी आणि तलाठी नेमके करतात तरी काय, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वाळू उपशावर नियंत्रण ठेवणे आणि अवैध वाहतुकीवर कारवाई करणे ही महसूल विभागाचीही महत्त्वाची जबाबदारी असताना, अधिकारी व तलाठी यांची भूमिका नेमकी काय आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मांडळ परिसरातील पांझरा नदीपात्रातील वाळू वाहतुकीची वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी, प्रत्यक्ष पाहणी करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!