मारवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट?

0
IMG-20261028-WA0029

अमळगाव, मांडळ, शिरसाळे, कळमसरेसह परिसरातील गुटखा विक्रीचे केंद्र?

वाळू, अवैध दारू आणि सट्टा-मटक्यावरही कारवाईची मागणी

 

अमळनेर : तालुक्यातील मारवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढला आहे. वाळूची अवैध वाहतूक, अवैध दारू विक्री, सट्टा-मटका आणि प्रतिबंधित गुटख्याच्या विक्रीसारख्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यास पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेषतः अमळगाव, मांडळ, शिरसाळे, कळमसरे आणि परिसरातील इतर गावे गुटखा विक्रीचे केंद्र बनली आहेत.

 

अवैध गुटखा विक्रीवर कारवाई कधी?

 

प्रतिबंधित गुटख्याची विक्री हा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर विषय आहे. संबंधित गावांमध्ये प्रतिबंधित गुटखा विकला जात आहे. पोलिसांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

 

वाळू, दारू आणि सट्टा-मटक्याचाही प्रश्न

 

गुटखा विक्रीबरोबरच वाळूची अवैध वाहतूक, अवैध दारू विक्री आणि सट्टा-मटका यांसारख्या कथित अवैध धंद्यांवरही प्रशासनाने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. पांझरा काट हा मारवड पोलीस ठाणे हद्दीत असून मांडळ पासून शहापूर – तांदळी पर्यंत अवैध वाळू वाहतूक सुरु आहे.  

वाळूच्या अवैध वाहतुकीविरोधात महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कारवाई करावी. तसेच अवैध दारू, सट्टा-मटका आणि प्रतिबंधित गुटखा विक्रीच्या प्रकरणांत तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

 

मारवडला वाळू वाल्यांची बैठक?

 

मांडळ भागात सूरु असलेल्या अवैध वाळू वाहतूक बाबत मारवड येथे संबंधित विभागाचे हुजूर, मध्यस्ती दलाल व वाळू माफिये यांच्यात बैठक झाली व उर्वरित वाहणांचे देखील प्रसाद तात्काळ पाठवा असे ठणकावून सांगण्यात आले असल्याची चर्चा तालुक्यात रंगात आहे. कारण प्रसाद कमी वाहनांचा व वाळू वाहतूक जास्त वाहन करीत आहेत हे हुजूरांना समजले असावे. म्हणून आता वाळू व इतर अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने सुरु आहेत हे समजणार नाही एवढीही भोळी जनता नाही व वरिष्ठ अधिकारीही नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!