महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या 33 वे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी….

0
IMG-20261024-WA0015

पुरस्कारासाठी प्रस्तावांची मागणी : ११ नोव्हेंबर पर्यंत मुदत

 

मुंबई  : पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याला न्याय देण्याचे काम सातत्याने करणाऱ्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय पुरस्कार – २०२६चे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत असल्याची माहिती संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी दिली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक व्यक्ती प्रसिद्धीपासून दूर राहून आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि समाजहितासाठी कार्य करत असतात. अशा निस्वार्थी आणि प्रेरणादायी कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या कार्याला राज्यस्तरावर ओळख मिळावी आणि त्यातून इतरांनाही प्रेरणा मिळावी, या उदात्त हेतूने हे पुरस्कार दिले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात असून, राज्यभरातील अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 

कोणत्या क्षेत्रातील प्रस्ताव पाठविता येतील ?

 

या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी खालील क्षेत्रात विशेष आणि उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती, संस्था, शेतकरी, उद्योजक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांनी आपले प्रस्ताव पाठवावेत.

१. शैक्षणिक क्षेत्र : शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग, गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी केलेले कार्य.

२. सामाजिक क्षेत्र : समाजातील अनाथ, अपंग, महिला, वंचित घटकांसाठी केलेले उल्लेखनीय समाजकार्य.

३. राजकीय क्षेत्र : स्वच्छ आणि पारदर्शक राजकारण, समाजहितासाठी केलेले राजकीय योगदान.

४. कृषी क्षेत्र : शेतीमध्ये नवनवीन प्रयोग, सेंद्रिय शेती, शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी कार्य.

५. उद्योग क्षेत्र : ग्रामीण भागात उद्योग उभारून रोजगार निर्मिती करणारे उद्योजक.

६. सहकार क्षेत्र : सहकार चळवळीच्या माध्यमातून शेतकरी आणि सर्वसामान्यांना न्याय देणारे कार्य.

७. समाजभिमुख कार्य : पत्रकारिता.पर्यावरण, आरोग्य, कला, क्रीडा, साहित्य या क्षेत्रातील विशेष योगदान.

 

प्रस्ताव कसा आणि कुठे पाठवावा ?

 

इच्छुक व्यक्तींनी आपला प्रस्ताव व्यवस्थित तयार करून त्यामध्ये आपला संपूर्ण बायोडाटा, आपण केलेल्या कार्याची सविस्तर माहिती, कार्याचे फोटो, वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या कात्रणांच्या झेरॉक्स, मिळालेले पुरस्कार, प्रमाणपत्रे आदी कागदपत्रे जोडावीत.

सदर प्रस्ताव दि. ११ नोव्हेंबर २०२६ पर्यंत  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, कार्यालय – अकोले, जि. अहिल्यानगर या पत्त्यावर पोस्टाने अथवा प्रत्यक्ष उपस्थित राहून जमा करावा. प्राप्त झालेल्या सर्व प्रस्तावांची छाननी संघाच्या राज्यस्तरीय निवड समितीकडून केली जाणार असून, प्रत्येक प्रस्तावाचा जाणीवपूर्वक आणि सकारात्मक विचार करून पात्र व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड केली जाईल. तरी राज्यातील जास्तीत जास्त पात्र आणि कर्तृत्ववान व्यक्तींनी व संस्थांनी आपले प्रस्ताव अंतिम मुदतीपूर्वी पाठवावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!