तरुण चेहरा सुयोग धनगर यांना प्रभाग 12 मध्ये जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रुग्णवाहिका, शवपेट्या व पाणीपुरवठ्यासाठी बोरवेलचे आश्वासन

अमळनेर : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. 12 मध्ये तरुण उमेदवार सुयोग ज्ञानेश्वर धनगर यांचा प्रचार वेग घेत असून, नागरिकांकडून त्यांना उल्लेखनीय असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सुयोग धनगर हे शहरातील सर्वपरिचित समाजसेवक ज्ञानेश्वर उर्फ नाना धनगर यांचे सुपुत्र. नाना धनगर यांनी कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याची जनतेला अद्यापही जाणीव असून, त्या विश्वासाचा फायदा सुयोग यांच्या प्रचाराला मिळताना दिसत आहे.
कोविड महासाथीच्या काळात अनेकजण परस्परांपासून दूर राहात असताना नाना धनगर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून शेकडो मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार मोफत केले. रुग्णांच्या मदतीसाठी धडपड केली. त्या काळात दाखवलेली त्यांची सेवाभावाची भावना लोकांच्या मनात घर करून राहिली आहे. सुयोग धनगर यांनीदेखील त्याच धर्तीवर जनसेवेचा ध्यास घेत, राजकीय क्षेत्रातून अधिक व्यापक प्रमाणात काम करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
प्रभागातील नागरिकांशी संवाद साधताना सुयोग धनगर यांनी महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
त्यात विशेषतः —
प्रभागासाठी स्वखर्चाने मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे
मृत व्यक्तीसाठी ३ मोफत शवपेट्यांची सुविधा
पाणीटंचाई असलेल्या भागांमध्ये ३ ठिकाणी बोरवेल खोदून पिण्याच्या पाण्याची सोय
या सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध करून देत प्रभागातील मूलभूत अडचणी कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, असे सुयोग यांनी सांगितले.
प्रचारादरम्यान महिलांचा, युवकांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सुयोग धनगर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या विनम्र स्वभावामुळे आणि सामाजिक कार्याच्या घराण्यामुळे सुयोग धनगर यांच्याबद्दल नागरिकांमध्ये विश्वासाची भावना निर्माण झाल्याचे दिसत आहे.
प्रभाग 12 मधील वाढता जनसमर्थनाचा कल लक्षात घेता सुयोग धनगर हे या निवडणुकीत लक्षवेधी उमेदवार ठरत आहेत.
