नगर परिषदेचा रस्ता आपल्या मालकीचा समजून मुंदडा बिल्डर्सने केला बंद….

0

नगर परिषद कारवाई करणार का 

अमळनेर : नगर परिषदेचा रस्ता आपल्या मालकीचा समजून तो बंद करण्याचे काम मुंदडा बिल्डर्सने शहरात केले आहे. शहरातील महाराणा प्रताप चौक येथील ऍक्सिस बँकेच्या बाजूला मुंदडा बिल्डर्सने एक संकुल उभारले आहे. त्याला लागून अमळनेर नगर परिषदेचा एक रस्ता होता मात्र त्या रस्त्याला बंद करण्याचा घाट मुंदडा बिल्डर्सने केले आहे. त्यांनी हे संकुल बांधले तेव्हा पासून हा रस्ता बंदच आहे. या रस्त्यातून चिकाटे गल्लीत जाणाऱ्या व येणाऱ्या लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. म्हणून हा रस्ता अमळनेर नगर परिषदेने पुन्हा सुरु करावा अशी मागणी होत असून तो बंद करणाऱ्या मुंदडा बिल्डर्सवर तात्काळ कारवाई करावी अशीही मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!