बौद्ध, मुसलमान व मेहतरांनो जो तुमच्या घरांसाठी बिल्डरांविरोधात आपली भूमिका मांडेल त्यालाच मतं द्या

0

बिल्डरांसह पुढाऱ्यांना तुमची किंमत समजू द्या….

 

अमळनेर : मतदार संघात मोठा जातीवाद पाहायला मिळतो. आणि तो जातिवाद एवढा पोखरला गेला आहे की, या जातीयतेच्या आजारामुळे बिल्डर लोकं देखील काही जातींना घरे देत नाहीत. या जातींमध्ये प्रामुख्याने बौद्ध म्हणजे महार, मुसलमान आणि मेहतर म्हणजे भंगी अशा जाती आहेत. या जातीची बिल्डर लोकांना काय ऍलर्जी आहे हे तेच सांगू शकतील.

म्हणून यांच्या विरोधात दिव्य लोकतंत्रचे संपादक समाधान मैराळे यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. येवढेच नव्हे तर आता हा लढा अधिक तीव्र करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे की, जे उमेदवार बौद्ध, मुसलमान व मेहतर समाजाला घरे देण्यासाठी आपल्या जाहीरनाम्यात घोषणा करतील की, मी या तिन्ही जातींना बिल्डर लोकं घरे देतील यासाठी पाठपुरावा करेल. व घरे देण्यासाठी त्यांना भाग पाडले. याच उमेदवार लोकांना तुम्ही तुमचे मत द्या असे आवाहन दिव्य लोकतंत्रचे संपादक समाधान मैराळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!