मुंदडा बिल्डर्स, आदित्य बिल्डर्स यांच्यासह अनेक बिल्डरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी…
दिव्य लोकतंत्रकडे अमळनेरसह संपूर्ण महाराष्ट्रातुन संपर्क साधत जनता करतेय गुन्हा दाखल करण्याची मागणी
अमळनेर : गेल्या अनेक दिवसांपासून अमळनेर येथील जातीयवादी बिल्डर्सच्या विरोधात दिव्य लोकतंत्र बातम्या प्रकाशित करीत असून त्यांचा चांगलाच भांडाफोड करीत आहे. या बाबत अनेक बातम्या जनमानसात प्रसिद्ध होत असून जनतेत रोष निर्माण होत आहे. सध्या काही दिवसांनी ह्या विषयावर जनआंदोलन उभे राहिले असे वाटते. रोज अमळनेर तालुक्यासह महाराष्ट्रातील बौद्ध, मेहतर व मुस्लिम समाजाचे लोक व इतर समाजातील बुद्धीजीवी लोक दिव्य लोकतंत्रशी संपर्क साधत असून, तुम्ही खूप मोठ्या विषयात या लोकांचा चांगलाच भांडाफोड केला असल्याचे म्हणत आहेत, तर या बाबत लवकरच मुंदडा बिल्डर्सचे मालक ओमप्रकाश मुंदडा, विधानसभा इच्छुक उमेदवार तथा आदित्य बिल्डर्सचे प्रशांत निकम यांच्यासह इतर बिल्डरांवर अट्रोसिटी कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे.
तर या जातीयवादी बिल्डर्सच्या कामांवर आम्ही कामे करणार नाहीत, आमच्यात देखील स्वाभिमान आहे, जर आमच्या समाजाला तुम्ही घरे देत नसतील तर आम्हीही त्यांच्याकडे कामाला का जावे असा सवाल काही कामगारांनी व्यक्त केला आहे. तर भविष्यात आम्ही यांच्याकडे कामालाही जाणार नाहीत असे त्यांनी म्हटले आहे.