सचिन पाटील विधानसभा निवडणूक लढणार…
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांच्याकडे सोपविला उमेदवारी अर्ज
अमळनेर : तालुक्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना आता तालुक्यातील युवा नेतृत्व व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन बाळू पाटील यांनी विधानसभा लढण्याची इच्छा दर्शवत मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश कार्यालय येथे भेट देत प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांच्याकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा अमळनेर विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर येत्या काही दिवसात अमळनेर मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची अमळनेर येथे सभा घेण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. यावेळी सचिन पाटील यांच्यासोबत अनंत निकम हे देखील उपस्थित होते. दरम्यान सचिन पाटील यांच्या या निर्णयाने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मी अनेक वर्षांपासून अमळनेर तालुक्यात पक्षासाठी काम करीत आहे. मला अनेक प्रलोभने आली मात्र मी पक्षाची साथ कधी सोडली नाही, पक्षासाठी कायम एकनिष्ठ आहे. तर अनेक वर्षांपासून तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत असतांना माझा मतदार संघात दांडगा संपर्क असून माझा कार्यकर्त्यांचा परिवार देखील मोठा आहे. म्हणून मला उमेदवारी मिळावी अशी मागणी मी पक्षाकडे केली आहे.
सचिन पाटील – इच्छुक उमेदवार तथा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष