विद्येश्वर महादेव मंदिर परिसरात CCTV कॅमेऱ्याचे लोकार्पण
डॉ.अनिल शिंदे तसेच महेंद्र महाजन यांच्या सहकार्याने परिसरात राहणार कॅमेऱ्याची नजर
अमळनेर : येथील विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिर परिसरात आता कॅमेराची नजर असणार आहे. चोऱ्यांसारख्या गुन्ह्यावर यामाध्यमातून आढा बसणार आहे. अनिल शिंदे नर्मदा फॉउंडेशंन तसेच कुबेर ग्रुपचे मालक महेंद्र सुदाम महाजन यांच्या सहकार्याने CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सोमवारी कॅमेऱ्याचे लोकार्पण डॉ. अनिल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. हे सर्व कॅमेरे कार्यन्वित करण्यात आलेले आहेत. दरम्यान लोकार्पण प्रसंगी रवि पाटील, महेंद्र महाजन सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.