स्पर्धा परीक्षा म्हणजे मोठी संधी व चक्रव्यूह… हिमांशू टेंभेकर
अमळनेर : करिअर कौंसेलिंग सेंटर, प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) व पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वारी UPSC या उपक्रम अंतर्गत संघ लोक सेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हिमांशू टेंभेकर यांचे मूलभूत स्वरूपाचे मार्गदर्शनपर व्याख्यान पूज्य साने गुरुजी सभागृहात शनिवार १० ऑगस्ट रोजी संपन्न झाले.
या समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जैन हे होते.तर विचारमंचावर खा.शि.मंडळाचे सह सचिव डॉ.धिरज वैष्णव, अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्षचे समन्वयक डॉ.मुकेश भोळे, पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक विजयसिंग पवार, करिअर कौंसेलिंग सेंटरचे प्रमुख डॉ. विजय तुंटे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला UPSC ची वारी व स्पर्धा परीक्षा नेमके काय आहे ? या बद्दलची विस्तृत माहिती प्रास्ताविकतेमधून विजयसिंग पवार यांनी दिली. प्रमुख वक्त्यांची परिचय प्रा. विजय साळुंखे यांनी करून दिला.
प्राचार्य डॉ.अरुण जैन व डॉ.धिरज वैष्णव यांनी पुष्प गुच्छ देऊन अतिथींचे स्वागत व सत्कार केले.
आपल्या सव्वा तास चाललेल्या व्याख्यानात हिमांशू टेंभेकर यांनी म्हटले की, स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांनी सदैव सकारात्मक राहिले पाहिजे, तथागत बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे स्वयं प्रकाशित झाले पाहिजे, अपयशाने कधीही खचून न जाता कठीण परीक्षांना सामोरे गेले पाहिजे, चहू बाजूंकडे डोळसपणे पाहिले पाहिजे,आपणास जर स्पर्धा परीक्षेच्या मैदानात उतरायचे असेल तर पूर्ण तयारीनिशी उतरणे आवश्यक आहे. त्यासाठी खूप वाचन करणे गरजेचे आहे तसेच समाज माध्यमा पडून लांब राहणे करिअरच्या दृष्टीने महत्वाचे आहे. यामुळे सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड देण्यासाठी वैचारिक शहाणपण अंगी येते.याकरिता संघर्ष महत्वाचे आहे कारण या शिवाय जीवनात शौर्य नाही तसेच स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्यासाठी तीन बाबी वर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
१) अभ्यासक्रम पाहणे
२) या पूर्वीचे प्रश्न अभ्यासणे
३) चालू घडामोडी
यशस्वी होण्यासाठी शॉट नोट्स काढणे आवश्यक आहे.आपले मत व्यक्त करताना शेवटी ते म्हणाले की, प्रभू और न कोही वरदान चाहीए, बस अभी युद्ध के लिए मैदान चाहीए.
प्रस्तुत सामारंभ करिता डॉ. जितेंद्र पाटील, प्रा.नितीन पाटील, डॉ.माधव भुसनार, डॉ.हेमंत पवार, प्रा.नितेश कोचे, डॉ.बालाजी कांबळे, ग्रंथपाल दिपक पाटील, डॉ.महेंद्र महाजन, डॉ.प्रदीप पवार, प्रा.दिलीप तडवी आदी प्राध्यापक उपस्थित होते.
प्रस्तुत मार्गदर्शनपर व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी डॉ.राखी घरटे , प्रा.दिलीप तडवी, दिलीप शिरसाठ, पंकज भदाणे, पराग पाटील, दिपक चौधरी, अक्षय सोनार, हिमांशू गोसावी, अनिकेत अहिरे आदींनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विजय तुंटे यांनी केले तर आभार विजयसिंग पवार यांनी मानले.