सूतगिरणीच्या महाघोटाळ्याबाबत अमळनेर शहरात झळकताय बॅनर…
सूतगिरणीच्या 19 कोटीला चुना लावल्याचा बॅनरवर आरोप ;काही दिवसांपूर्वी मंत्री अनिल पाटलांनी देखील केला होता आरोप
अमळनेर : गेल्या काही दिवसांपूर्वी मंत्री अनिल पाटील यांनी माजी आमदार शिरीष चौधरी व त्यांचे बंधू रवींद्र चौधरी यांनी सूतगिरणी बाबत घोटाळा केला असल्याचा आरोप केला होता. या बाबत मतदार संघात मोठी खळबळ उडाली होती.
मात्र आज सकाळ पासून अमळनेर शहरात याच सूतगिरणीच्या घोटाळ्याबाबत बॅनर झळकले असून हे बघून देखील जनता आश्चर्य व्यक्त करीत आहे. या बॅनर वर शासकीय परिपत्रकं, बँक स्टेटमेंट असे अनेक पुरावे देखील छापण्यात आले आहेत.
तर महाघोटाळा म्हणत घोटाळेबाज बंधूंचा कारनामा, अमळनेरकारांनो उघडा डोळे पहा नीट, अबबब….असे म्हणत खाली पुरावे दाखवले आहेत. पुन्हा त्या खाली सूतगिरणीच्या 19 कोटीलाच लावला चुना…. एकच विनंती…निर्णय घ्या व यांना कायमचे हद्दपार करा ! स्वाभिमानी भूमिपुत्र ग्रुप, अमळनेर असे लिहिले आहे.
यावरून असे समजते की मंत्री अनिल पाटील यांच्या समर्थकांकडून हे बॅनर लावले गेले असावेत. मात्र हे बॅनर व त्यावरील पुरावे पाहून अमळनेर मतदार संघात एकच खळबळ उडाली आहे.