अमळनेर मतदार संघात सर्व सामान्यांच्या कैवारीला साथ द्या… गणेश नकवाल

0

डॉ. अनिल शिंदे यांना साथ देण्याचे आवाहन

 

अमळनेर : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. अनिल शिंदे हे सर्व सामान्य जनतेचे नैतृत्व असून ते सामान्यांचे कैवारी देखील आहेत म्हणून त्यांना साथ द्या असे आवाहन वाल्मिकी मेहतर समाज उत्थान परिषद प्रदेशाध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस सामाजिक न्याय विभाग नॅशनॅलिस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गणेश नकवाल यांनी केले आहे

सध्या मतदार राजाने महाविकास आघाडीला विजयी करण्याचा एकच हट्ट धरला आहे. म्हणून अमळनेर मतदार संघात देखील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करा असेही नकवाल यांनी म्हटले आहे.

डॉ. शिंदे हे अनेक ठिकाणी पदाधिकारी आहेत. ते खान्देश शिक्षण मंडळात देखील चेअरमन होते. त्याठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांना फेलो करण्यासाठी त्यांनी आग्रह धरला होता. मात्र या बाबीस तत्कालीन काही लोकांनी विरोध केला होता. असेही गणेश नकवाल यांनी म्हटले आहे. तर डॉ. शिंदे यांनी त्यांच्या जीवनात अनेक रुग्णांचे जीव वाचवले असून त्यांच्या दवाखान्यामूळे व इतर उद्योगामुळे अनेकांचा संसार सुरु आहे.

डॉ. अनिल शिंदे यांच्या मनात अमळनेर मतदार संघांसाठी अनेक योजना आहेत. व त्यासाठी आपल्याला त्यांना आमदार करणे गरजेचे असून मतदार राजाने डॉ. अनिल शिंदे यांना मत देऊन भरघोस मतांनी विजयी करा अशी विनंती गणेश नकवाल यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!