श्रीकृष्ण उत्कृष्ठ संघटन कौशल्याचे प्रतीक!!

0

श्रीकृष्ण चरित्रातून समता, बंधुता, एकतेचा मिळतो संदेश

दिव्य लोकतंत्र विशेष : प्रत्येक साहित्यातून काही प्रतिमा अजरामर झाल्या. महाभारत ग्रंथातील श्रीकृष्ण चरित्र गावातील सर्व जाती-जमातीतील मुले सोबत घेऊन गायी चारण्यासाठी जाणारा श्रीकृष्ण व त्याचे जीवलग सवंगडी होते. गोकुळात आपल्या मावशीच्या घरी राहून यशोदेला स्वमाते प्रेम करणारा शाम होता. गोकुळातील दुध गावातच राहण्यासाठी दही, दुध, लोणी याचे मटके फोडणारा शाम हा गोकुळात दुधासाठी क्रान्ति करणारा दिसून येतो. गोकुळात ज्यावेळेस इंद्राची पूजा करणास सक्ती होते. त्यावेळी निसर्ग हाच म्हणजेच वृक्ष हेच वर्षा येण्याचे पटवून इंद्राची पुजा थांबविणारा कृष्ण होय. बुध्दाच्या जातक कथेवरुन बरेच साहित्य निर्माण झाले. साहित्य निर्माण होण्यासाठी समोर एक आदर्श हवे त्यामुळेच जातक कथा हा आधार घेऊन साहित्य निर्मिती झाली. बुध्दाच्या काळात वैज्ञानिकतेला महत्व आले होते. इतर धर्मांनी काल्पनिक गोष्टींवर भर देत साहित्य लिहिले. भारतातच नास्तिक ही परंपरा ही जन्माला आली.सगुण रूप माणणारे लोक तसेच निर्गुण रूप माणणारे ही होतेच..किती ही जग पुढे गेले तरी काही धर्मांनी बदलण्याची इच्छा दाखविली नाही. प्रत्येक धर्माचा उद्देश मोक्ष होता. मोक्ष म्हणजे न संपणारा आनंद होय. तो कुठे स्वर्गात नाही तर याच भूमीत मिळविता येतो. नरक ही दुखाची वृत्ती होय. धर्माने लोक सुखी व्हावे हा जरी उद्देश असला तरी काही धर्मांनी त्यासाठी संपूर्णतः अहिंसा स्विकारली नाही. सर्वोच्च आनंद प्राप्त करणे हा प्रत्येक धर्माचा गाभा असला तरी सर्वच धर्मांनी तो योग्य वाटचालीतुन प्राप्त केला नाही. श्रीकृष्ण चरित्रात सर्वसमावेशक दाखविले आहे. गोकुळात केलेले कार्य हे संघटनाचा उत्कृष्ट नमुना आहे. दहीहंडी हे आनंद प्राप्ती चे प्रतीक आहे. तेच बुध्द धम्मातील अष्टांगिक योग प्राप्त केल्यावर बुध्दत्व म्हणजे जीवन जगण्याची अप्रतिम वृत्ती मिळविणे होय. बुध्दाच्या विविध शिल्पात ते दिसून येते. श्रीकृष्णाने सांघिक कामाने यश मिळविले. गीतेत विविध ज्ञान मिळविण्याच्या तसेच मोक्ष प्राप्ती च्या पायर्‍या सांगितल्या आहेत. श्रीकृष्ण चरित्रात दौपदीला राजसभेत साडी पुरविणारा भाऊ म्हणून दाखविलेला आहे. बाल गोपाळात आनंद घेणारा शाम सर्व मित्रांना घेऊन खेळ खेळणारा दाखविलेले आहे.आज युवक वर्ग दहीहंडीच्या रुपात श्रीकृष्ण जयंतीचा आनंद घेतात. श्रीकृष्णाने प्रत्येकाच्या भाकरीचा स्वाद घेतला..आपले लोणी, ताक, दही सर्वांना दिले. तसे प्रत्येक जाती धर्माने गुण्यागोविंदाने राहण्याचे प्रतीक ही दहीहंडी आहे. अगदी जीवावर बेतून दहीहंडी फोडणे ही सार्थकता नाही. प्रत्येकाने एकमेकात दही,लाह्या, साखर सारखे मिसळून जाऊन आम्ही सर्व एक आहे हे दाखविण्याचे प्रतीक आहे.
संतानी पंढरपूरला काला केला तो समतेचा प्रतीक आहे. वारकरी पंढरपूरात केवळ विठ्ठलाचे दर्शन घेत नव्हते तर तिथे ज्ञानावर चर्चा होत होती. ह्या ज्ञानाचे गाठोडे घेऊन वारकरी सर्वांना वाटत हा खरा काला होय. हा काला प्रतीक म्हणून सर्व जाती-धर्मातील लोक लाह्या, दही, खडीसाखर त्या ठिकाणी वाटप करित असत. हा समतेचा काला संतांनी चालू ठेवला. ह्या काल्यासाठी वारकरी पंढरपूरात जातात. श्रीकृष्ण युवकाचे प्रतीक होय. युवक दहीहंडी फोडतात ते आनंद व्यक्त करण्यासाठी होते . एक विधायक दृष्टीकोण ठेऊन दहीहंडी साजरी झाली पाहिजे. कुणालाही ईजा न होता साजरी केली गेली पाहिजे. जीवीतहानी होत असेल तर त्याला काय अर्थ? एकतेचे, बंधुतेचे, समतेचे प्रतीक म्हणून दहीहंडी साजरी व्हावी ही अपेक्षा आहे.

पत्रकार तथा लेखक
एस. एच. भवरे
अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!